जेवणाचे वाटप करताना फोटो काढल्यास गुन्हा दाखल होणार  JUDICIAL REVIEW NEWS

अन्न धान्य, जेवणाचे वाटप करताना फोटो काढल्यास गुन्हा दाखल होणार 

 मुंबई , दि 10 : देशभरात लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे येत गरजूंना मदत केली आहे. मात्र ही मदत करताना अनेकांनी त्याचे फोटो काढले असून सोशल मीडियावर टाकले आहेत. अशा फोटोप्रेमींवर आता गुन्हे दाखल होणार आहेत. अन्न धान्य, जेवण गरजूंमध्ये वाटणाऱ्यांनी जर स्विकारणाऱ्यासोबत फोटो घेतले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय अजमेरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. ‘जर अशी कोणतीही घटना आमच्या निदर्शनास आली तर तर आम्ही सदर व्यक्तीवर कडक कारवाई करु. तसेच त्याच्यावर भारतीय कायद्यान्वये कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करू’, अशा माहिती अजमेरचे जिल्हाधिकारी विश्व मोहन शर्मा यांनी दिली. अजमेरमध्ये एका व्यक्तीने गरजू लोकांना दोन केळी वाटली होती व त्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. ते प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. 

Comments