अकोला ब्रेकिंग-२३ अहवाल प्राप्तः चार पॉझिटीव्ह, १९ निगेटीव्ह तर एक मयत

*२३ अहवाल प्राप्तः चार पॉझिटीव्ह, १९ निगेटीव्ह तर एक मयत*

 अकोला,दि.१(जिमाका)- आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे २३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १९ अहवाल निगेटीव्ह तर चार अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील एका व्यक्तीस मंगळवारी (दि.२८ एप्रिल) मयत अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते, त्याचा अहवाल आज प्राप्त झाला.दरम्यान आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ३२ झाली असून प्रत्यक्षात १७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ६९७ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ६७१ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ६३९ अहवाल निगेटीव्ह तर ३२ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व २६ अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत एकूण ६९७ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५४४, फेरतपासणीचे ९२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ६१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६७१ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५२३ तर फेरतपासणीचे ८७ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ६१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६३९ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ३२ आहेत. आज प्राप्त झालेल्या २३ अहवालात १९ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर चार अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आता सद्यस्थितीत ३२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील चार जण मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३) सात जण व सोमवारी (दि.२७) एका जणास व गुरुवारी (दि.३०) तिघांना असे ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १७ जण उपचार घेत आहेत. दरम्यान ज्या मयत व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला त्या व्यक्तीस मयत अवस्थेतच मंगळवार दि.२८ रोजी रुग्णालयात आणले होते. त्याचा घशातील स्त्रावाचा नमुना घेऊन तो चाचणी साठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे. हा ५६ वर्षीय व्यक्ती खैर महम्मद प्लॉट या भागातील रहिवासी असून तो फळ विक्रेता होता. अन्य एक रुग्ण ७९ वर्षीय पुरुष असून तो रामदास पेठेतील टिळक पार्क जवळ राहणारा आहे. तर एक ६६ वर्षीय महिला व ३९ वर्षीय पुरुष हे दोघे या आधीच्या एका पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील असून ते कंवरराम सोसायटी येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली. दरम्यान आजअखेर ७२७ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३२४ गृहअलगीकरणात व १०१ संस्थागत अलगीकरणात असे ४२५ जण अलगीकरणात आहेत. तर २४० जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर ६२ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Comments