Posts

अकोला ब्रेकिंग-२३ अहवाल प्राप्तः चार पॉझिटीव्ह, १९ निगेटीव्ह तर एक मयत

* २३ अहवाल प्राप्तः चार पॉझिटीव्ह, १९ निगेटीव्ह तर एक मयत *  अकोला,दि.१(जिमाका)- आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे २३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १९ अहवाल निगेटीव्ह तर चार अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील एका व्यक्तीस मंगळवारी (दि.२८ एप्रिल) मयत अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते, त्याचा अहवाल आज प्राप्त झाला.दरम्यान आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ३२ झाली असून प्रत्यक्षात १७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ६९७ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ६७१ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ६३९ अहवाल निगेटीव्ह तर ३२ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व २६ अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत एकूण ६९७ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५४४, फेरतपासणीचे ९२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ६१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६७१ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५२३ तर फेरतपासणीचे ८७ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ६१ अहवाल आ

BREAKING  NEWS Judicial Review Akola

BREAKING  NEWS AKOLA  अकोल्यात मास्क न वापरल्यास दंड  जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी जावयाचे असेल तेव्हा प्रत्येकाने आपला चेहऱ्याचे तोंड व नाक हे मास्क अथवा रुमालाने झाकणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मास्क अथवा रुमालाने नाक व तोंड न झाकलेल्या व्यक्तीस एक रकमी दंड करण्याची कारवाई करावी असे आदेशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे _________________________

जेवणाचे वाटप करताना फोटो काढल्यास गुन्हा दाखल होणार  JUDICIAL REVIEW NEWS

अन्न धान्य, जेवणाचे वाटप करताना फोटो काढल्यास गुन्हा दाखल होणार    मुंबई , दि 10 : देशभरात लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे येत गरजूंना मदत केली आहे. मात्र ही मदत करताना अनेकांनी त्याचे फोटो काढले असून सोशल मीडियावर टाकले आहेत. अशा फोटोप्रेमींवर आता गुन्हे दाखल होणार आहेत. अन्न धान्य, जेवण गरजूंमध्ये वाटणाऱ्यांनी जर स्विकारणाऱ्यासोबत फोटो घेतले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय अजमेरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. ‘जर अशी कोणतीही घटना आमच्या निदर्शनास आली तर तर आम्ही सदर व्यक्तीवर कडक कारवाई करु. तसेच त्याच्यावर भारतीय कायद्यान्वये कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करू’, अशा माहिती अजमेरचे जिल्हाधिकारी विश्व मोहन शर्मा यांनी दिली. अजमेरमध्ये एका व्यक्तीने गरजू लोकांना दोन केळी वाटली होती व त्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. ते प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. 

अकोला कोरोना अपडेट :एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह चौघांना बाधा

अकोला कोरोना अपडेट :एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह चौघांना बाधा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना गुरुवारी रात्री उशीरा आणखी चौघांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेत. धक्कादायक बाब म्हणजे हे चौघेही एकाच कुटुंबातील असून, यामध्ये ३ वर्षांची मुलगी, ५ वर्षांच्या मुलासह त्यांची आई आणि एका ३० वर्षीय युवकाचा समावेश आहे. 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अकोला जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या १३ वर पाहोचल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे चारही बाधित रुग्ण बैदपुरा येथील रहिवासी असून, अकोल्यातील पहिल्या बाधित रुग्णाच्या कुटुंबातील आहे. त्यामुळे आता अकोला शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६ झाली आहे. शहरात ६ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर मनपा प्रशासनाने बैदपुरा परिसर सील करून आरोग्य विभागाने त्याच्या कुटुंबियांना आयसोलेशनमध्ये दाखल केले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करुन स्वॅब चाचणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. गुरुवारी रात्री उशीरा या चौघांचेही वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बैदपुरा

Travelling in trains won't be easy post lockdown; JUDICIAL REVIEW

Travelling in trains won't be easy post lockdown; know these changes made by Indian Railways If reports are to be believed, it would not be easy for passengers to travel in trains post April 14 in case the lockdown is lifted. As per reports, the Ministry of Railways has prepared protocols for the passengers to check the spread of coronavirus in view of possible train operations. Reports say as per the protocols prepared by the Railways, the passengers will have to come 4 hours early at the railway stations. This would enable the railway officials to conduct thermal screening of passengers at the stations. Moreover, only passengers with reserved tickets will be allowed to enter the station.

 ब्रेकिंग न्यूज़ अकोला Judicial Review News

* ब्रेकिंग न्यूज़ अकोला *  *महत्त्वाची माहिती* कोरोना संसर्गग्रस्तांचे अद्यावत अहवाल अकोला जिल्ह्यात एकूण तपासलेले नमुने- १४८ अहवाल प्राप्त संख्या-१०९ पॉझिटिव्ह -९ निगेटिव्ह-१०० * आज सकाळी प्राप्त अहवालानुसार पातूर येथील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.* *हे सर्वजण वाशीम येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते* *आता अकोला जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.* अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

अकोला ब्रेकिंग

अकोला ब्रेकिंग  स्थानिक गौरक्षण रोड येथील हरी ओम मेडिकल समोर असलेल्या एका सुपर शॉपीला आग लागली असल्याची माहिती आहे. अग्निशमन विभागाचे दल तेथे पोहोचले असून आगी वर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरू आहे.